वियोम फाऊंडेशनची सुरवातएप्रिल २०१० मध्ये झाली. फाऊंडेशन सुरु करण्यामागे विविध क्रीडा, व्यायाम, शैक्षणिक, सामाजिक, विज्ञान व कला विषयक क्षेत्रात काम करण्याच्या उद्देश असल्याने १०-१२ प्रतिष्ठित लोक एकत्र येत वियोम फाऊंडेशनची स्थापना केली. या अगोदर सुध्दा वियोमच्या नावे विविध समाजिक कार्य सुरु केली होती त्याला एक व्यापक स्वरूप देण्यासाठी वियोम फाऊंडेशनची सुरुवात झाली. त्यामध्ये खालील व्यक्तींचा सहभाग होता.

अध्यक्षा         : सौ. विनया बाळ तोरसकर
कार्यवाह        : बाळ तोरसकर
सं. कार्यवाह   : अरुण देशमुख
खजिनदार     : संदीप रणशूर=
विश्वस्त         : अतुल्य सिंग, प्रल्हाद पेडणेकर, संदिप पटवर्धन,रवी पाष्टे, निलेश परब,  विनय मयेकर, गीता बेहरा.

वियोम फाऊंडेशनने खेळांना व खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी पहिलाच उपक्रम म्हणून मातीतल्या चपळ व वेगवान अशा खो-खोची निवड केली व त्यातूनच ४४ व्या राष्ट्रीय पुरुष व महिला खो-खो स्पर्धेचे आयोजन करण्याचा निर्णय घेतला. हि स्पर्धा १५ ते २० मे या कालावधीत शिवाजी पार्क, दादर, मुंबई येथे पार पडली. या स्पर्धेत संपूर्ण देशभरातून ६६ संघ सहभागी झाले होते. खो-खो महासंघाचे सुवर्ण महोत्सवी वर्षा निमित्त व मुंबईच्या इतिहासातील हि पहिलीच राष्ट्रीय खो-खो स्पर्धा ठरली. जवळ जवळ १५०० खेळाडू, पदाधिकारी, कार्यकर्तेयांची रहाण्याची व संपूर्ण जेवणाची व्यवस्था फाऊंडेशनने केली होती. पहिल्यांदाच खो-खोत राष्ट्रीय स्पर्धेत रोख रु. एक लाख प्रथम क्रमांकाच्या संघाला देऊन गौरवण्यात आले. या स्पर्धेती प्रत्येक खेळाडूला काहीना काही बक्षीस देऊन गौरवण्यात आले. हि स्पर्धा यशस्वी करण्यासाठी मा. मंत्री अजितदादा पवार साहेब (दादा), अध्यक्षा सौ. विनया बाळ तोरसकर, आ. सुनील शिंदे, नगरसेवक आशिष चेंबुरकर, कामधेनू डीपार्टमेंटल स्टोर प्रा.ली; व इंडिअन ऑईल व इत्यादिंनी मोलाचे सहकार्य केले.

स्पर्धा यशस्वी करण्यासाठी मुंबई खो-खो संघटना व संघटनेचे खो-खो कार्यकर्ते यांचे विशेष सहकार्य लाभले. महाराष्ट्र खो-खो असोशिएशन व खो-खो फेडरेशन ऑफ इंडिया यांनी सुद्धा सहकार्य केले. या स्पर्धेचे उद्घाटन महाराष्ट्राचे मा. उप मुख्यमंत्री छगन भुजबळ व महाराष्ट्र खो-खो असोशिएशनचे अध्यक्ष व मा. मंत्री अजितदादा पवार तर स्पर्धेचा समारोप महाराष्ट्राचे मा. गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्या हस्ते पार पडले.