१९५० च्या आसपास पुरुषांच्या खो-खो संघात एक जबरदस्त ताकद होती. तेव्हा आनंद गोखले या उत्साही तरुणाने श्री समर्थ व्यायाम मंदिराच्या खो-खो ला चालना दिली. अर्थात संस्थापक कै. काळे गुरुजींनी प्रोस्ताहन दिले व ज. सु. पडवळ सरांनी मार्गदर्शन केले म्हणूनच खो-खो चा खांब समर्थच्या मैदानात समर्थपणे रोवला गेला व सुमारे ५ ते ६ वर्ष चांगला रुजला गेला.

आनंद गोखले यांच्या सोबतच रमेश व शरद पालकर बंधूं, भाई मोरे, सुमन म्हात्रे अश्या डझनभर खेळांडूनी श्री समर्थ खो-खोला उभारणी दिली. नंतरच्या पिढीत राजा जेस्ते, राजा व मोहन आजगावकर, प्रल्हाद दुदवडकर, यशवंत भिसे, अनिल गोखले हि नावे जबरदस्त गाजली. राजा जेस्ते, राजा आजगावकर व मोहन आजगावकर यांनी तर राष्ट्रीय पातळीवर सुध्दा चमक दाखवली. या खेळाडूंमधील श्री. रमेश पालकर हे सर्वोकृष्ट प्रशिक्षक म्हणून लोकमान्य ठरले तर आनंद गोखले काही काल संघटनात्मक कार्यात उत्साहाने कार्य करीत होते तर त्यांचे छोटे बंधू अनिल गोखले हे काल परवापर्यंत कार्यात सहभागी होत असत. या साऱ्यांचा पुढील खो-खो चा विकास इतर संस्थातून झाला हे खरेच आहे. पण त्यांच्या खो-खो चा ‘श्रीगणेशा’ मात्र श्री समर्थच्याच मैदानात झाला हे सत्य आहे. १९४६ ते १९५० या साला दरम्यान भारतातील हा एक नामवंत संघ होता. श्री. रमेश पालकर यांच्या मार्गदर्शनाखाली राजा जेस्ते, आनंद गोखले, प्रकाश कारखानीस, रमेश तेंडूलकर, बंड्या बंदागले, नंदू देशपांडे, विलास सापळे, भगत, बंड्या नाडकर्णी, कुंजहरी वगळ इ. अशी एक मोठी खो खोतील पिढी त्यांनी उदयास आणली. मात्र संस्थेचे संस्थापक कै. प्र. ल. काळे गुरुजींशी – खेळ हा मनोरंजनासाठी व शरीर वृद्धीसाठी का स्पर्धेसाठी या वादात संघ दोन वेळा फुटला. १९५२-५३ च्या हंगामात व्यवस्थापनाशी मतभेद झाले आणि खो-खो च्या या प्रचंड व समर्थ फौजे मध्ये उभी फूट पडली आणि डझन भर प्रमुख खेळाडूंनी व्यायामशाळेला सोडचिठ्ठी दिली. त्या काळात खो-खोत नुकत्याच उदयास आलेल्या दादरच्या अमरहिंद मंडळाच्या ताज्या दमाच्या नव्या आव्हानाला रमेश पालकर यांच्यानेतृत्वाखाली ‘समर्थ’ टक्कर देत असतानाच सोडचिठ्ठीचा संघर्ष घडला ! १ ली फळी बाहेर पडली ​ती ​श्री. रमेश पालकर यांच्या सोबत निघाली व ती विजय क्लब या संघास जाऊन मिळाली. त्यानंतरही श्री आनंद गोखले ह्यांनी श्री समर्थचा संघ टिकवण्याचा प्रयत्न केला. ही २ री फळी बाहेर पडली व संस्थेचा खो खो संघच बंद पडला. त्यानंतर सुमारे २५ वर्षे संस्थेत खो खो खेळ गेला नाही.

साधारणतः १९५५ नंतर समर्थचे मैदान उजाड झाले. खो-खो मधून जसे समर्थचे नाव एकदम अदृश्य झाले ते १९७५-७६ च्या मोसमात नारायण गाडगीळ स्मृती चषक स्पर्धेच्या निमित्ताने पुन्हा एकवार खो-खो क्षितिजावर आले. दिवंगत नारायण गाडगीळ हे समर्थचे प्रामाणिक कार्यकर्ते होते. खो-खोतील उत्कृष्ट पंच म्हणून त्यांचा नावलौकिक होता. त्यांचे अकाली निधन झाले. त्यांच्या स्मृतीला अभिवादन म्हणून समर्थने गाडगीळ चषक स्पर्धा सुरु केली. हा चषक दिवंगत गाडगीळ यांच्या पत्नीने श्रीमती शकुंतला यांनी समर्थला देणगी दाखल दिला. या स्पर्धेचे वैशिसित्य भारतीय क्रीडा क्षेत्रात पंचाच्या स्मृतीला खेळाडूंनी अभिवादन करणारी बहुधा हि पहिलीच स्पर्धा असावी तसेच ती खास नवोदित खो-खो खेळाडूंसाठी होती.

ज्युनिअर गटातील खो-खो खेळाडूंचा उत्साह कायम उल्हसित राहावा हा प्रमुख उद्देश या ‘गाडगीळ’ चषकाचा होता. नंतरच्या काळात तो यशस्वी झाल्याचा प्रत्यंतर आले जेव्हा या स्पर्धेतून खेळलेल्या असंख्य खेळाडूंपैकी अनेक खेळाडूंनी मोठ्या राष्ट्रीय गटात कीर्ती संपादन केली.

१९८१ च्या सुमारास श्री शेखर पाठारे यांनी श्री समर्थच्याच जनरल गेम्स मधील रायाजी पथक संपूर्णतः खो खो विभाग म्हणून घेत हा विभाग सुरु केला. याच रायाजी पथकातील प्रमुख असलेल्या अॅड. अरुण देशमुख याच्या मदतीने हा विभाग उत्तम रुजू लागला.  श्री. शेखर पाठारे यांच्या मार्गदर्शनाखाली पुन्हा एकदा संस्थेने खो खो​​​ संघ सुरु केला. या संघातून संतोष बोरकर, प्रसाद पारसनीस, संदेश बोरकर हि मुले तर शिल्पा पुणेकर, अभया राणे या व अश्या काही खेळाडूंनी  राष्ट्रीय पातळीवर चमक दाखवली. संतोष बोरकर, प्रसाद पारसनीस, संदेश बोरकर, अतुल गोखले, आमोद गोखले, अभया राणे, अपर्णा राणे, प्रज्ञा पोंगशे, शिल्पा पुणेकर या सारख्या राज्यस्तरिय पातळीवर चमकणारे खेळाडू यातून निर्माण झाले. याच विभागातील इतर खेळाडूंनीही खो खो मध्ये चमक दाखवली यात अॅड. अरुण देशमुख यासह प्रशांत भट्टे, योगेश मोहिते, अनिल फडके, अजित गद्रे, स्मिता पालांडे, नयना देसाई, वंदना माजलकर, संपदा बोरकर, नृपाली राजे, अतुल भागवत, सुनील भागवत, निलेश परब, मनीष पालांडे, संज्योत कुलकर्णी, हेमप्रकाश गढेकर, नागराज मुकेरा व नितीन परब अशी अनेक खेळाडूंची फळी निर्माण झाली. १९८९ च्या सुमारास शेखर पाठारे यांचे कार्यकारिणी बरोबर मतभेद झाले आणि खो खो विभाग त्यांच्याच विद्यार्थ्याकडे म्हणजे अॅड. अरुण देशमुख याच्याकडे आला. त्या वेळी फक्त २ मुले मैदानात शिल्लक होती. याच दरम्यान नारायण गाडगीळ स्मृती चषक ही स्पर्धा काही अपरिहार्य कारणांमुळे खंडित झाली. पण ‘समर्थ’ खो-खो कार्यकर्ते व खेळाडू निराश झाले नाहीत. अॅड. अरुण देशमुख यांच्या नेतृत्वाखाली शाळकरी मुलामुलींवर श्री समर्थने परत लक्ष केंद्रित केले आणि पुन्हा एकदा नव्या पिढीने खो-खोत नाव निर्माण करण्याचा चंग बांधला. योगेंद्र हर्डीकर, राजेश वराडकर, विकास शिरगावकर, भूपेश ठाकूर, मकरंद बाणे, मनोज वैद्य, प्रशांत साखरे, बाबली वैद्य, नितेश पाटील, क्रांती खांडेकर, शीतल पांचाळ, स्मिता नेवाळकर, स्नेहा नेवाळकर, दीपिका सोनावडेकर, अमृता झवेरी,  शेखर पाटील, गार्गी पंडित, प्राची वाडदेकर हि पहिली फळी जोरात खेळून नावारूपाला आली. १४, १८ तसेच पुरुष गटाचे तर मुलींमध्ये किशोरी, १८ वर्षाच्या मुलींच्या गटाचे तसेच महिला गटात अंतिम फेरीत चमक दाखवायला सुरुवात केली. त्यानंतर तेजस अमीन, अश्विन सहस्त्रबुद्धे, साकेत जेस्ते, तेजस शिरसकर, विराज कोठमकर, वरूण  पाटील,  राजेश्री अमीन, तन्वी  पटवर्धन, ऋचा गाडगीळ, मैत्रेयी केळकर,  साजल पाटील,  अनुष्का प्रभू   असे अनेक खेळाडू खो-खोच्या नभात चमकले.

१९८९ सालापासून अॅड. अरुण देशमुख यांनी खो खो विभागाची धुरा खांद्यावर घेतली ती आयतागाजत सुरवातीला खालच्या गटात अंतिम फेरीत मजल मारणाऱ्या या संघाने पाहता पाहता सर्वच गटांमध्ये दबदबा उमटवला. यातील पुढे बाबली वैद्य, साकेत जेस्ते या दोघांनी राष्ट्रीय पुरुष स्पर्धेतील अष्टपैलुचे एकलव्य पुरस्कार, तर साकेत जेस्ते व अश्विन सहस्त्रबुद्धे या दोघांनी राष्ट्रीय कुमार स्पर्धेतील अष्टपैलुचे वीर अभिमन्यू पुरस्कार मिळवले. बाबली वैद्य, साकेत जेस्ते, विकास शिरगावकर, मनोज वैद्य, तेजस शिरसकर यांनी महाराष्ट्र शासनाचा शिव छत्रपती पुरस्कर प्राप्त केला तर अॅड. अरुण देशमुख यांना महाराष्ट्र शासनाचा दादोजी कोंडदेव पुरस्कार प्राप्त झाला. अनेक खेळाडूंना जिल्हा क्रीडा पुरस्कार सुद्धा प्राप्त झालाय.​

मुंबई जिल्हयात समर्थ व्यायाम मंदिराचा पुरुष संघ सलग ११ वेळा अजिंक्यपद विजेता ठरलाय तर महिलांचा संघ ४ वेळा अजिंक्यपद ठरलाय.

श्री समर्थने अॅड. अरुण देशमुख यांच्या नेतृत्वाखाली १९९६ साली १८ वर्षाखालील गटाच्या राज्यस्त​री​य स्पर्धा घेतल्या. यात श्री. नंदकुमार वाडदेकर यांनी यात प्रमुख भूमिका वर्तवली. यानंतर २००३ साली श्री समर्थने अॅड. अरुण देशमुख यांच्या नेतृत्वाखाली १४ वर्षाखालील गटाच्या राज्यस्तरी​य स्पर्धा घेतल्या. तर २०१० साली पुरुष महिला गटाची राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धा वियोम फौंडेशनच्या माध्यमातून अॅड. अरुण देशमुख​, श्री. बाळ तोरसकर आणि श्री. निलेश परब यांनी उत्तमरीत्या श्री समर्थच्या मैदानात घेतली. राज्याचे पंच शिबीर असो किंवा राष्ट्रीय प्रशिक्षण पूर्व शिबीर श्री समर्थ म्हणजे राज्य संघटनेचे एक हक्काचे घर म्हणून नेहमी समजले जायचे.

गेल्या काही वर्षात समर्थच्या खो-खो प्रांगणात खो-खोच्या अनेक स्पर्धा झाल्या उदा. शालेय स्पर्धा, मुंबई महापौर चषक​ – राष्ट्रीय स्तर, राज्यस्तरीय व विभागीय स्तर स्पर्धा, महाराष्ट्र खो-खो खुल्या गटाची अजिंक्यपद स्पर्धा, खो-खो फेडरेशनची राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धा, ४४ वी पुरुष व महिला गट राष्ट्रीय अजिंक्यपद खो खो स्पर्धा, अनेक अखिल भारतीय निमंत्रित स्पर्धा, अगदी नव्या धर्तीवरची केकेपीएल स्पर्धा सुद्धा या क्रीडांगणात झाल्या व होत आहेत.

१९९५ पासून श्री समर्थने खो खो शिबीर सातत्याने भरावले. ३०० जणांच्या संख्येला शिकवण्यासाठी समर्थाचे ताजे खेळाडू पुढे असायचे. २०१६ पर्यंत सलग खो खो शिबीर घेतले गेले. म्हणूनच श्री समर्थच्या या क्रीडांगणास खो-खो ‘पंढरी’ म्हटले जाते. असा एखादा खेळाडू विरळाच ज्याने खो-खोच्या या पंढरीवर आपले कौशल्य दाखविले नसेल. अनेक राष्ट्रीय कीर्तीच्या खेळाडूंच्या पदलालीत्याने हे क्रीडांगण पवित्र झाले आहे.

शिव छत्रपती विजेते खेळाडू

अनु. खेळाडूचे नाव पुरस्कार वर्ष फोटो
1 बाबली दिलीप वैद्य  २००४-०५
2 विकास शिरगावकर  २००६-०७
3 साकेत जेस्ते  २००८-०९
4 मनोज दिलीप वैद्य  २०११-१२
5 तेजस शिरसकर  २०१२-१३

संघटक पुरस्कार

अनु. संघटक पुरस्कार वर्ष फोटो
 1 श्री. उदय देशपांडे १९८२-८३

दादोजी कोंडदेव पुरस्कार

अनु.  प्रशिक्षक पुरस्कार वर्ष फोटो
1 श्री. उदय देशपांडे २००३-०४
2 अॅड. अरुण देशमुख ​२​००८-०९