महाराष्ट्रात तालीम आखाडा आन व्यायामशाळा या संस्था आता फार मोठ्या प्रमाणात दिसत नसल्या तरी प्राचीन काळापासून आपले भारतीय मलविद्या, धनुर्विद्या, शास्त्रविद्या यात अत्यंतपारंगत असल्याबद्दलची साक्ष आपला इतिहास देतो.

दूरदृष्टीच्या काही शक्तीदेवाच्या उपासकांनी मागील शतकात आधुनिक आखाड्याची पध्दत सुरु केली. अश्या आखाड्यातूनच बाहेर पडलेल्या शीलवान व शिस्तबध्द तरुणांनी स्वातंत्र लढ्यातअनेक ठिकाणी बहुमोल कामगिरी बजावली आहे.ओम समर्थ भारत व्यायाम शाळेचे संस्थापक डॉ. त्रि. रा. नरवणे यांनी १९२०च्या असहकार आंदोलनात पदवी परीक्षेवर बहिष्कार घालून१९२१ च्या एप्रिलमध्ये डॉ. त्रि. रा. नरवणे यांनी रचनात्मक व संघटना त्मक कार्य केले. नंतर ते सांगलीहून मुंबईला आले. डॉ. नरवणे यांची मित्रमंडळी त्यांच्या सोबत होती. या सर्व सहकारयाच्याजोरावर १९२४ मध्ये दादरला हिरजी असुच्या वाडीत एका खोलीत ओम समर्थ व्यायाम मंदिराची सुरवात झाली नंतर १९२८ (दासनवमी माघ वद्य ९ शके १८९४) ला भिग सोवनी, डॉ. य. वि.पुरंदरे, गोपाळराव डबीर (मोतीवाले), गं. ब. जोशी (लादिवाले) तत्कालीन नगरसेवक पां. ग. उर्फ अप्पासाहेब सहस्त्रबुद्धे, डॉ.मा. भै. उदगावकर आदींच्या मदतीने ओम समर्थ भारत व्यायाममंदिराची स्थापना झाली. १९२८ नंतर येथे आपल्या उपक्रमाने कार्यरत झाले.

राष्ट्रीय भावनेतून देशभक्त निर्माण करणाऱ्या या संस्थेला त्याग, निष्ठा आणि रचनात्मक कार्यांची परंपरा आहे. स्वातंत्र्याच्या चळवळीत डॉ. त्रि. रा. नरवणेंनी कारावास भोगला आहे. त्या त्यागीस्वातंत्र्य सेनानीने उभारलेल्या या संस्थेची आणि मैदानाची पूर्वपीठिका आहे.

२६ जानेवारी, १९५२ च्या प्रजासत्ताक दिनी मुंबईच्या व्यायामपटूची तुकडी दिल्लीला गेली. तिचे नेतृत्व याच संस्थेचे अण्णा कोपडेकरांनी केले होते. आता डॉक्टरांचे सुपुत्र उन्मेश नरवणे यांचेनेतृत्व या संस्थेला लाभले आहे. डॉ. दिलीप साठे हे या संस्थेचे विद्यमान चिटणीस आहेत.

जशी गरज तशी शारीरिक बलसंवर्धनाच्या योजना या मैदानावर आखून त्या राबविल्या गेल्या. महिलांसाठी असलेली स्वतंत्र्य व्यायामशाळा हे हि वैशि स्थ आहे तर १९२९ ते १९६५ या दरम्यानआघाडीवर असलेल्या आट्यापाट्या खेळाचे मैदान पुसून येथे त्यानंतर खो खो चे क्रीडांगण तयार झाले. या खेळात या संघाचे किशोर, कुमार, पुरुष असे अनेक नामांकीत खेळाडू तयार झाले वत्यांनी खो खो क्षेत्रात ओम समर्थ भारत व्यायाम मंदिर संघ गेल्या वीस वर्षात मुंबईचा बलाढय संघ म्हणून सर्वत्र छाप पडू लागली. आमच्या श्री. प्रकाश रहाटे या खेळाडूस २००७-०८ या वर्षीचामहाराष्ट्र शासनाचा शिव छत्रपती पुरस्कार प्राप्त झाला आहे तर श्री. विलास कारंडे यास २०१४-१५ साली राष्ट्रीय पातळी वरील एकलव्य पुरस्कार प्राप्त झालाय.

लाठी काठी दंड पट्टाऐवजी येथे कराटे सुरु झाला. आज या खेळात ब्लॅक बेल्ट मिळवलेले खेळाडू आहेत. आता या ठिकाणी जिमन्यास्टिक प्रशिक्षण हि सुरु आहे व यातील खेळाडू प्राविण्यमिळवीत आहेत.

ज्योस्त्ना पांचाळ या इथे बालवाडी चालवीत व महिलांसाठी उपक्रमही राबवीत होत्या.

शिव छत्रपती विजेते खेळाडू
अनु. खेळाडूचे नाव पुरस्कार वर्ष फोटो
1 प्रकाश रहाटे २००७-०८